डेरवण येथील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत “जय गणेश इंग्लिश मिडीयम”च्या मुलींची छाप

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात ब्रॉन्झपदक

मालवण | कुणाल मांजरेकर

डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलींच्या संघाने १४ वर्षांखालील गटामध्ये ब्राॅन्झ पदक पटकाविले. या संघात कु. आर्या दिघे, कु. प्राची चव्हाण, कु.वर्षा परुळेकर, कु.सावली मोरजकर यांचा समावेश होता.

यशस्वी विद्यार्थिनींना मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या विष्णू कोरगांवकर, सुजन परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मालवण एज्युकेशन सोसायटी आणि जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे सचिव हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!