प्रियांका गांधींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणात काँग्रेसकडून फळवाटप

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामीण रुग्णालय मालवणमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, महिला तालुकाध्यक्ष तथा वायरी ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगांवकर, योगेश्वर कुर्ले, ऍड. अमृता अरविंद मोंडकर, पराग माणगांवकर, गणेश पाडगावकर व रुग्णालयामधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!