उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून आ. कालिदास कोळंबकर आणि कुटुंबियांचं सांत्वन
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना कोळंबकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आ. कोळंबकर यांच्या भोईवाडा येथील निवासस्थानी जाऊन आ. कोळंबकर आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कोळंबकर कुटुंबियांचे स्नेही उपस्थित होते.