सामंत साहेब, शतायुषी व्हा……

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे नेते, उद्योजक दत्ता सामंत यांचा ५४ वा वाढदिवस शनिवारी रात्री त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजपच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. “सामंत साहेब शतायुषी व्हा, आणि जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात असेच कार्यरत राहा”, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. दिवसभरात सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनी वरून त्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा ५४ वा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा झाला. दिवसभरात अनेकांनी त्यांच्या घुमडे निवासस्थान आणि कुंभारमाठ कार्यालयात त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी उशिरा घुमडे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी दत्ता सामंत यांची मुलगी कु. सान्वी हीचा देखील वाढदिवस असल्याने याठिकाणी दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चा कुडाळ मंडळ अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडळ अध्यक्ष पप्या तवटे, मालवण पं. स. चे उपसभापती राजू परुळेकर, श्रावण विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, मकरंद राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, प्रसाद मोरजकर, सागर कुशे, स्वप्नील गावडे, प्रकाश पावसकर, निलेश बाईत, मोहन वेंगुर्लेकर, विनायक बाईत, उमेश घाडीगावकर, सुधीर साळसकर, बाबू बिरमोळे, महेंद्र चव्हाण, भाजयुमो तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर आणि मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, मिहीर राणे, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, सुधीर वस्त, विष्णू बिरमोळे, बाळा माने, महेश बागवे तसेच संतोष साटविलकर, संतोष कोदे, शेखर पेणकर, राजन माणगांवकर, दीपक प्रभुकेळूसकर, अमोल प्रभुकेळूसकर, सहदेव बापर्डेकर, राजू बिडये, भाई मांजरेकर, सचिन आंबेरकर यांच्यासह अन्य मान्यवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“कोकण मिरर” च्या डॉक्युमेंट्रीचे आकर्षण

दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकण मिरर डिजिटल न्यूजच्या वतीने सलग दोन वर्षे दत्ता सामंत यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेणारी विशेष डॉक्यूमेंट्री प्रसारित करण्यात येत आहे. मागील वर्षी प्रमाणे यंदाही या डॉक्यूमेंट्रीचे कार्यक्रम स्थळी प्रसारण करण्यात आले. या डॉक्यूमेंट्रीचे उपस्थितांनी कौतुक केले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!