मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील “तो” धोकादायक खड्डा तात्काळ बुजवा !
माजी नगरसेवक दीपक पाटकर, ललित चव्हाण यांनी वेधले लक्ष ; पालकमंत्र्यांसह माजी खा. निलेश राणेंशी केली चर्चा
आंगणेवाडी यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याची सा. बां. अधिकाऱ्यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर देऊळवाडा सागरी महामार्ग येथे भलमोठा खड्डा पडला आहे. याठिकाणी लहान मोठा अपघात होण्याशी शक्यता नाकारता येत नाही. तरी हा धोकादायक खड्डा तात्काळ बुजवावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी केली आहे.
या धोकादायक खड्ड्यामुळे अपघात होता होता अनेक जण वाचले आहेत. तसेच आठवडा बाजाराच्या वेळी येथे बरेच अपघातही घडले. ही गोष्ट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ त्या ठिकाणी भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सचिन हडकर, शुभम लुडबे, रमाकांत फाटक, दुर्गेश गावकर, बाबू वायंगणकर, निनाद बादेकर, राजा मांजरेकर, मुन्ना फाटक, श्रीराज बादेकर, राजू बिडये, महेश सारंग यांना सोबत घेऊन पाहणी केली. यावेळी तात्काळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून हे काम आंगणेवाडी जत्रेपूर्वी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी हे काम तातडीने सुरू करून देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली.