देऊळवाडा-कोळंब सागरी महामार्ग डांबरीकरणाची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून काम सुरू झाल्याचे सांगत शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी
मालवण : मालवण शहरातील कोळंब-देऊळवाडा या सागरी महामार्गाच्या डांबरीकरण हॉटमिक्स कामास बुधवारी सुरुवात झाली. वर्षभरापूर्वी या निविदेला मंजुरी मिळाली होती मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मालवण युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तीन तारखेला खड्डे बुजवणे काम चालू झालं. आता हॉटमिक्स काम चालू झालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी कामाच्या दर्जाची पाहणी केली. तसेच डांबरीकरण कामास आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी आल्याने आमदार वैभव नाईक यांच्या घोषणाही त्या ठिकाणी देण्यात आल्या.
यावेळी माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, राजू परब, किरण हिर्लेकर, सचिन कांबळी, जया मसूरकर, जयवंत कळमकर, गौरव वेर्लेकर, शुभम बिडवलकर, तुषार हडकर, चेतन खोत, प्रथमेश राऊत, उमेश खडपकर, एकनाथ आंबेरकर, सागर धुरी, आकाश मडये, संकेत वाईरकर, जयवंत कोळंबकर, सिद्धेश पाटकर, पीटर फर्नांडिस, रोशन शिर्सेकर, अजय कांबळी, सचिन कांबळी, बाबू वाघ, सुदेश हिर्लेकर, पंकज कवठकर, सर्वेश लुडबे, गौरव हडकर, नितेश नरे यासह अन्य उपस्थित होते.