दीपक पाटकर यांचं सामाजिक कार्य मालवण शहराच्या वेशीबाहेर !

कांदळगाव रामेश्वर मंदिर नजिकच्या परिसरात स्वखर्चाने बसवले बाकडे

राजकीय मतांची गोळा बेरीज बाजूला ठेवून दाखवलेल्या दातृत्वाचे होतेय कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्वतःच्या मतदार संघात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे राजकारणी आपण नेहमी पाहिले. मात्र मालवण शहरात समाजसेवक म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा वसा शहराच्या सीमेबाहेर नेऊन ठेवला आहे. कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर नजिकच्या परिसरात भाविकांना बसण्यासाठी दीपक पाटकर यांनी स्वखर्चाने तीन बाकडे उपलब्ध करून दिले आहेत. राजकीय मतांची गोळा बेरीज बाजूला ठेवून दीपक पाटकर यांनी दाखवलेल्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर हे सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. शहरात केवळ स्वतःच्या वॉर्डा पुरतं मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण शहरात आपल्या सामाजिक सेवेचा वसा जपला आहे. मालवण तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दीपक पाटकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच मंदिर परिसरात स्वखर्चाने तीन बाकडे बसवले आहेत. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

मंगळवारी श्री. पाटकर यांनी याठिकाणी पाहणी केली. यावेळी उमेश कोदे, संतोष पारकर, दत्तविहार कोदे, पप्पू मुळीक, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थानी श्री. पाटकर यांचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!