सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग स्पर्धेत युवराज सिंग संघाने मिळवले विजेतेपद

हरभजन सिंग संघाला उपविजेते पद ; मालवणच्या बोर्डिंग मैदानावर संपन्न झाली स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट क्लबच्या वतीने आणि मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाखाली येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग मैदान येथे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवस आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंच्या सिंधुदुर्ग प्रीमिअर लिग टेनिस क्रिकेट स्पर्धेत अनिल हळदीवे यांच्या मालकीच्या युवराज सिंग संघाने संदीप साटम-सुधीर साटम यांच्या हरभजन सिंग संघावर १० गडी राखून मात करीत विजेतेपद पटकविले. विजेता आणि उपविजेता संघाला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ क्रिकेटपटू तथा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदीवे, उपाध्यक्ष काका कुडाळकर, बाबली वायंगणकर, दिलीप वर्णे, राजन नाईक, सुनील धुरी, विजय जोईल, बबन परब, रिझवान शेख, सुधीर साटम, शरद शिरोडकर, पपू परब, नितीन वाळके, जिल्हा व तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडारसिक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ क्रिकेटपटू, उद्योजक तथा मालवणी कवी बाबला पिंटो यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील मालिकावीर संतोष मडगावकर, उत्कृष्ट फलंदाज संजू फर्नांडिस, उत्कृष्ट गोलंदाज दर्शन नार्वेकर, उत्कृष्ट यष्टीरक्षक रिझवान शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिल हळदीवे तर अंतिम सामन्यातील सामनावीर किरण परब यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू अनिल हळदीवे, पपू परब, बबन परब, आनंद आळवे, बाबली वायंगणकर यांचा तसेच राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करण्यासाठी पात्र ठरलेल्या टोपीवाला हायस्कुलच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाचा मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या लीग स्पर्धेत बाबा परब यांचा युसूफ पठाण संघ, संजू कल्याणकर यांचा झहीर खान संघ, सत्यवान राणे यांचा सचिन तेंडुलकर संघ, संतोष केनवडेकर यांचा वीरेंद्र सेहवाग संघ, अनिल हळदीवे यांचा युवराज सिंग संघ, संदीप साटम-सुधीर साटम यांचा हरभजन सिंग संघ, सुनील पेडणेकर यांचा एम एस धोनी संघ, राजू पाटणकर यांचा गौतम गंभीर संघ तर हुसेन मकानदार यांचा सुरेश रैना संघ असे नऊ संघ सहभागी झाले. पंच म्हणून अमेय मांजरेकर, बंटी केरकर, सुनील मालवणकर, उमेश मांजरेकर, सुशील शेडगे यांनी काम पहिले. गुणलेखन विल्सन फर्नांडिस तर समालोचन प्रदीप देऊलकर, श्याम वाक्कर, महेश डोंगरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उमेश मांजरेकर, राजू आचरेकर, निळकंठ मालणकर, वासुदेव वरवडेकर, सुशील शेडगे, संदीप धुळे, हेमंत कोचरेकर, मंगेश धुरी, शंकर पराडकर, दीपक धुरी, रवी मालवणकर, झहीर शेख, नंदन देसाई, जितू वाळके, बबन रेडकर, मुकेश बावकर यांनी परिश्रम घेतले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!