पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० कि. मी. च्या रस्ते कामांना मंजुरी
खा. विनायक राऊत यांचा केंद्र सरकारकडे पाठपूरावा ; विविध ३७ कामांचा समावेश
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किलोमीटरच्या रस्त्यांना केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३७ कामांचा समावेश आहे. ही यादी दीर्घकाळ केंद्र सरकारकडे प्रलंबीत होती. खा. राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्या नंतर या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. खा. विनायक राऊत यांनी १५ डिसेंबर रोजी खासदार सुनिल तटकरे व खासदार बाळू धानोरकर यांच्या समवेत संबंधित केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेवून मंजूरीसाठी विनंती केली होती. तरी सुद्धा कामे मंजूरीसाठी आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच २१ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना घेवून संबंधित मंत्री व सचिव स्तरावर बैठक घेवून त्यामध्ये सर्व खासदारांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील खासदारांनी सुचविलेल्या रस्त्यांना निधीची तरतुद व निधीची तरतुद करुन कामे मंजूर करण्यात आली आहेत.