नांदोस येथे तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

मालवण : नांदोस चव्हाणवाडी येथील मनोजकुमार मंगेश चव्हाण ( वय – ३६) या तरूणाने सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थानी मनोजकुमार चव्हाण याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर रूग्णवाहिकेने मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कार्यवाही सुरू होती. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर अधिक तपास करीत आहेत. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!