ग्रा. पं. निवडणूक : वैभववाडीत सर्वाधिक, तर वेंगुर्ल्यात सर्वात कमी मतदान
सिंधुदुर्गात पहिल्या दोन तासात सरासरी १३ % मतदान
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
जिल्ह्यात जाहीर झालेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९१ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७.३० पासून मतदान सुरु झाले असून सकाळी ९.३० पर्यंत ४ लाख ९ हजार ३४३ मतदारांपैकी ५३ हजार ६४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी १३.१० % मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान वैभववाडी तर सर्वात कमी मतदान वेंगुर्ल्यात झाले आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यात ५२, वेंगुर्ला २३, दोडामार्ग २८, कुडाळ ५४, मालवण ५५, कणकवली ५८, वैभववाडी १७, देवगड ३८ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. सकाळच्या दोन तासात तालुकानिहाय विचार करता सावंतवाडी – १४.३७ %, वेंगुर्ला- ८.७० %, दोडामार्ग – १३.६२ %, कुडाळ – १३.५१ %, मालवण – १३.४१%, कणकवली- १२.४४ %, वैभववाडी – १५.८३ % तर देवगड मध्ये १५.३० % मतदान झाले आहे.