वरची गुरामवाडी ग्रा. पं. मध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचारात भाजपची मुसंडी !

भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता ; ग्रामस्थांचा प्रचारात उत्स्फूर्त सहभाग

शेखर पेणकर यांच्यासह भाजपचे पॅनल १०० % विजयी होणार ; पदाधिकाऱ्यांचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीत भाजपा पुरस्कृत पॅनल विरुद्ध गाव पॅनल मध्ये काटेंकी टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात नियोजनबद्ध राबवलेल्या प्रचार यंत्रणेमुळे प्रचारात भाजपने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी भाजपने कट्टा बाजारपेठेत रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे बाजारपेठेसह संपूर्ण गावात भाजपची हवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि अनेकांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. वरची गुरामवाडी ग्रामपंचायत ही मालवण कसाल हमरस्त्यावरील नेहमी गजबजलेली कट्टा बाजारपेठ या ठिकाणी वसलेली ग्रामपंचायत. गेली अनेक वर्षे ही ग्रामपंचायत केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या एकहाती ताब्यात असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. राणे असतील त्याच पक्षाचा झेंडा या ग्रामपंचायतीवर फडकणार हे गेली अनेक वर्षे होत आले आहे. मागील पाच वर्षात थेट सरपंच निवड झाली त्यावेळी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा फडकवीत कट्टर राणे समर्थक असलेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांच्या रणनीतीतुन स्वाती सतीश वाईरकर ह्या सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली. पाच वर्षे या ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.

पेणकर कुटुंबियांचे वरची गुरामनगरी गावाशी काही पिढ्यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे शेखर पेणकर यांच्यासह भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी होईल, असा विश्वास वरची गुरामवाडी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ कार्यकर्ते शेखर पेणकर यांना थेट सरपंच निवडणूकीत उतरवले आहे. आज केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून सत्तेच्या माध्यमातून गावचा अधिकाधिक गतिमान विकास साध्य करण्यासाठी भाजप पुरस्कृत शेखर पेणकर आणि सदस्य पदाचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारालाही ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जनतेचा पाठिंबा व विश्वास यावर भाजप पुरस्कृत सर्व उमेदवारांचा विजयी विश्वास व्यक्त केला जात आहे. जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सुनिल नाईक, सरपंच पदाचे उमेदवार शेखर पेणकर, ऋषिकेश पेणकर, सागर माळवदे, विनीत भोजने, शेखर मसुरकर, रुपेश भोजने, प्रवीण गाड, सिद्धेश नाईक, अमित कोरगावकर, विनय मठकर, मंदार मठकर, सुनील धुरी, तेजस म्हाडगूत, अक्षय गावडे, सुभाष गिरकर, दिनेश राऊळ, प्रसाद राऊळ, पिंट्या खटावकर, दर्शन खटावकर, अण्णा कुबल, अनिल ढोलम, उमेश खटावकर, बाळा दाभोलकर, बाळा परब, सुनील नाईक, अभिजित शंकरदास, प्रसाद कामतेकर, योगेश कामतेकर, अक्षय भंडारे, चैतु माळवदे, राजू वाडकर, सिद्धू पेणकर यासह अन्य ग्रामस्थ, जेष्ठ, महिला, तरुण, तरुणी सहभागी झाल्या होत्या. येथील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा शेखर पेणकर व सदस्य पदाच्या उमेदवारांना लाभत आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!