असरोंडी ग्रा. पं. मध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपा बाजी मारणार ?
शिंदे गटाचा भाजपाला पाठींबा ; प्रचार मोहिमेत ज्येष्ठांचा सहभाग
मालवण | कुणाल मांजरेकर
तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आहेत आणि भाजपा मध्ये युती असून भाजपा – शिंदे गट पुरस्कृत पॅनलच्या प्रचारात गावातील ज्येष्ठ आणि ग्रामस्थांचा मिळणारा पाठींबा विचारात घेता येथे भाजपा एकतर्फी विजय मिळवेल, असा विश्वास माजी उपसरपंच मकरंद राणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याठिकाणी भाजपा नेते दत्ता सामंत आणि माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहीम राबवण्यात आली.
असरोंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गट पुरस्कृत ग्राम समृद्धी पॅनलचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सरपंच पदासाठी विलास मेस्त्री, तर सदस्य पदासाठी प्रभाग १ मधून मकरंद राणे, सेजल परब, प्रभाग २ मधून राजेंद्र सावंत (शिंदे गट), चैताली सावंत, प्रभाग ३ मधून दत्ताराम गावडे ( शिंदे गट) निवडणूक लढवत आहेत. तर प्रभाग १ मधून भाजपाच्या आरती आजगांवकर ह्या बिनविरोध आल्या आहेत. आज राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या पॅनलची सत्ता आल्यानंतर गावचे विकासाचे आणि अन्य प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गावात भाजपच्या प्रचारात अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी होताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरंद राणे, ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, संतोष महाजन, श्रेया गावडे, विलासिनी परब, शुभांगी सावंत तसेच मोहन सावंत, रामचंद्र सावंत, अनिल सावंत, रघुनाथ सावंत, विठ्ठल सावंत, श्रीकांत राणे, शुभम सावंत, संदीप सावंत, सचिन गावडे, बेटा गावडे, राजेंद्र सावंत, तनुजा चव्हाण, स्नेहल परब, शिवाजी जाधव, संचिता सावंत, सायली सावंत, रुपाली सावंत, क्रांती सावंत, स्वाती सावंत, मयुरी राणे, सरिता राणे, प्रणव राणे, सिद्धेश सावंत, विराज सावंत, अभिमन्यू सावंत, प्रकाश सावंत, रमाकांत सावंत, दत्ताराम सावंत, अनिता सावंत, हरिश्चंद्र घाडीगावकर, रविकांत घाडीगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे.
त्यांनी कितीही टीका करू देत, आम्ही विकासावरच बोलणार
गावातील एक माजी सरपंच दहा वर्षांपूर्वी येथील वॉर्ड क्र. १ मधून निवडून आले. पाच वर्ष त्यांनी भाजपची सत्ता उपभोगली. मात्र आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आमच्यावर ते कोणतीही टीका करीत असले तरी आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. विरोधासाठी विरोध अशी आमची वृत्ती नसून येथील मतदार देखील सत्याच्याच बाजूने उभे राहतील, असा विश्वास ज्येष्ठ ग्रामस्थ रघुनाथ सावंत यांनी व्यक्त केला आहे. आज राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून गावची विकास कामे पूर्ण केली जातील, असे ते म्हणाले.