आंबेरी ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांचा झंझावात

मालवण : आंबेरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांनी झंझावाती प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात मिळत असलेला प्रतिसाद पाहता मोठ्या मताधिक्याने मनमोहन डिचोलकर निवडून येतील असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सरपंच पदाचे उमेदवार मनोहन डिचोलकर यांनी घरोघर प्रचारावर भर दिला आहे. प्रचारात गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा आंबेरी गावात भेट देत उमेदवार, कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. युवा वर्गासह मोठ्या संख्येने महिला प्रचारात सहभागी झाल्या होत्या. घरोघर प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाऊन मनमोहन डिचोलकर यांनी झंझावाती प्रचार केला. गावात प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने मनमोहन डिचोलकर निवडून येतील असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!