प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वायरी भूतनाथ मध्ये भाजपाचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन ; शिंदे गटाची साथ

भव्य रॅलीने प्रचाराची सांगता ; सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांच्यासह पॅनलच्या विजयाचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रामपंचायत निवडणुकी साठीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. या अखेरच्या टप्प्यात वायरी भूतनाथ गावात भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. प्रचार समाप्तीला गावात काढण्यात आलेल्या रॅलीला ग्रामस्थानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांच्यासह पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

वायरी भूतनाथ गावच्या गतिमान विकासात्मक वाटचालीसाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या वतीने सरपंच पदाचे साठी मुन्ना झाड व सदस्य पदासाठी सोनाली सातार्डेकर, प्रतीक्षा केळुसकर, विकास मसुरकर, शुभांगी मेस्त, कविता मोंडकर, पांडुरंग मायनाक, संजय लुडबे, महिमा भगत, अरुण तळगावकर निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, संदेश तळगांवकर, दाजी सावजी, बबन आडयेकर, शैलेश लुडबे, प्रितम गावडे, नितीन तोडणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!