सुकळवाड ग्रा. पं. च्या निवडणुकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा विजय निश्चित

गावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास ; प्रचारात घेतली मोठी आघाडी

सरपंच पदासाठी युवराज विजय गरुड यांच्या रूपाने ठाकर समाजाला न्याय

मालवण | कुणाल मांजरेकर

सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. या ग्रामपंचायतीत भाजपने ठाकर समाजाच्या युवराज विजय गरुड या स्थानिक होतकरू व्यक्तीला सरपंच पदाची उमेदवारी देऊन या समाजाचा सन्मान केला आहे. प्रचाराचा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावातील ठाकर बांधवानी आपल्या समाजातील एकच व्यक्ती एकमताने सरपंच पदासाठी निवडली. आणि गावासमोर आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. मात्र हाताच्या बोटावर मावणाऱ्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी ठाकर बांधवांसाठी आलेले हक्काचे आरक्षण हिरावून घेऊन अन्यत्र हे पद मिळवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या प्रवृत्तीला सुकळवाडच्या सलोखाप्रेमी नागरिकांनी एकजुटीने युवराज गरुड आणि पॅनलला मोठे मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ब्राम्हणदेव पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी युवराज विजय गरुड उभे आहेत. तर सदस्य पदासाठी प्रभाग क्र. १ मधून अविनाश अशोक गरुड, जान्हवी भरत पालकर निवडणूक लढवत आहेत. तर याच प्रभागात भाजपच्या नरेंद्र सदाशिव पाताडे आणि किरण तुकाराम पाताडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. प्रभाग क्र. २ मधून वैदेही विक्रम मोरजकर आणि यशश्री चेतन मुसळे निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग ३ मधून वैशाली गुरुनाथ पाताडे, किशोर सदानंद पेडणेकर आणि आरती नंदकिशोर वायंगणकर निवडणूक लढवत आहेत.

मालवणच्या सीमेवर वसलेले सुकळवाड गाव हे पुरोगामी विचारसरणी आणि सर्व धर्म समभाव जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राजकारण हे तात्पुरत्या स्वरूपात केले जाते. इतरवेळी येथील ग्रामस्थ एकत्रच नांदतात. यंदा ठाकर समाजाला सरपंच पदावर विराजमान होण्याची संधी संविधान आणि ब्राम्हणदेवाच्या आशीर्वादामुळे मिळाली. सुकळवाड गावात गेली कित्येक पिढ्या गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या ठाकर समाजाला न्याय मिळतोय, असे चित्र दिसून येत असताना काही विघ्नसंतोषी मंडळींनी यामध्ये राजकारण करुंन ठाकर समाजासाठी असलेले पद अन्यत्र हिरावून नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र युवराज गरुड हे संपूर्ण गावात सुपरिचित असून प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. माध्यमिक शिक्षण घेऊन ते व्यवहारात तरबेज झाले असून ते सर्वांच्या अडिअडचणीला धावून जातात. सढळ हस्ते देणगी, गरजुना मदत यांमुळे ते लोकप्रिय आहेत. तसेच संपूर्ण गावातील ज्येष्ठ नागरिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत. युवराज विजय गरुड आणि सहकाऱ्यांचा विजय निश्चित असून सर्व ग्रामस्थांनी त्यांना बहुमत मिळवून द्यावे असे आवाहन प्रचार प्रमुख प्रकाश पावसकर, माजी उपसरपंच सागर कुशे, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी महिला बाल कल्याण सभापती सौ. माधुरी बांदेकर, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, माजी सरपंच सुभाष टेंबुलकर, माजी उपसरपंच सुभाष म्हसकर, सामाजिक कार्यकर्ते भाई राणे, भूषण पाताडे आणि सुकळवाड गावातील सुज्ञ कार्यकर्ते आणि नागरिकांनी केले आहे.

ब्राम्हणदेव गावविकास पॅनलची प्रचारात मोठी आघाडी

या उमेदवारांच्या प्रचारासाठी पदाधिकारी आणि गावातील ज्येष्ठानी हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळे युवराज गरुड आणि सहकाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रचारात ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ अध्यक्ष विलास पेडणेकर, उपसरपंच स्वप्नील गावडे, सामाजिक कार्यकर्ते चेतन मुसळे, महेश वायंगणकर, अशोक गरुड, प्रमोद आटक, अजय मयेकर, संतोष बिलये, संदीप म्हसकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!