विकासासाठी पाच वर्ष संधी द्या ; वायरी भूतनाथ गावाचा कायापालट करू !
भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
वायरी भुतनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनेलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांच्यासह पॅनेलच्या सर्व सदस्य पदाच्या उमेदवारांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केंद्रात व राज्यात भाजप युतीची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी मुन्ना झाड व सर्व पॅनेलला विजयी करूया. असे आवाहन प्रचाराच्या निमित्ताने गावात करण्यात आले. त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपच्या माध्यमातून वायरी भुतनाथ गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. एकूणच गावच्या गतिमान विकासात्मक वाटचालीसाठी सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड व सदस्य उमेदवार सोनाली सातार्डेकर, प्रतीक्षा केळुसकर, विकास मसुरकर, शुभांगी मेस्त, कविता मोंडकर, पांडुरंग मायनाक, संजय लुडबे, महिमा भगत, अरुण तळगावकर यांना ग्रामस्थ बहुमताने विजयी करतील. असा विश्वास भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास भाजप युती सरकारच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. ग्रामस्थ सांगतील त्याच पद्धतीने विकास हेच आमचे धोरण राहणार आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करू. अशी नम्र भावना सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांनी व्यक्त केली आहे.