वायरीत ठाकरे गटाला मोठा हादरा ; माजी उपसरपंच संदेश तळगावकर कार्यकर्त्यांसह भाजपात !

माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश ; ग्रा. पं. च्या विजयाचा मार्ग होणार सुकर

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. प्रतिष्ठेच्या वायरी ग्रा. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माजी उपसरपंच आणि ठाकरे गटाचे कट्टर समर्थक संदेश तळगावकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपात प्रवेश केला. राणेंच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. संदेश तळगावकर यांच्या प्रवेशामुळे या ग्रा. पं. मध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

संदेश तळगावकर हे ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी वायरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषवले आहे. त्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सोबत समीर मसुरकर, गीतेश तळगावकर, ओंकार लुडबे, विनायक तळगावकर, गंधार तळगावकर, राकेश तळगावकर, रवी तळगावकर, साई गावडे, अनिश तळगावकर, गजा रावले, प्रकाश सावंत, महेंद्र गावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे निलेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, अशोक तोडणकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, पूजा वेरलकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, निशय पालेकर, नारायण लुडबे, संजय कदम, विक्रांत नाईक, अरुण तळगावकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!