“त्या” विद्यार्थ्यांच्या दिल्लीवारी साठी भाजपा नेते निलेश राणेंचं पाठबळ !
मालवण : आचरा येथील बीएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची १६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या वंदे भारतम् कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या दिल्लीवारी साठी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पाठबळ दिले आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मदत सुपूर्द करण्यात आली.
या विद्यार्थ्यांमध्ये हर्षाली लाड, स्नेहल देसाई, तनुजा देसाई, मयुरी मुणगेकर, साक्षी लाड, करीना खराडे, गौरव लाड, हर्षद मेस्त्री, रितेश गोलतकर, नृत्य दिग्दर्शक – ऋतुजा राणे, निषाद गडकरी, प्राची राणे यांचा समावेश आहे. या मदती बद्दल सदरील विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.