कोट्यवधीचे विकास प्रकल्प दिसत नसतील तर गणेश कुशेंनी चष्म्याचा नंबर तपासावा

नगराध्यक्षांवरील “त्या” आरोपांना शिवसेना नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांचे प्रसिद्धी पत्रकातून उत्तर

कुणाल मांजरेकर

मालवण : नगरसेवक यतीन खोत यांनी स्वखर्चातून प्रभागातील झाडे आणि ग्रास कटरच्या घेतलेल्या मोहिमेवरून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर अकार्यक्षमतेची टीका करणाऱ्या भाजप गटनेते गणेश कुशे यांना शिवसेना नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षानी शहरात केलेले कोट्यवधीचे विकास प्रकल्प दिसत नसतील तर गणेश कुशेंनी स्वतःच्या चष्म्याचा नंबर तपासून घ्यावा, असा टोला शिरपुटे यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे..

    या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गणेश कुशे सारख्या नगरसेवकाने कार्यतत्पर नगराध्यक्षांवर टीका कारणे हास्यास्पद. गेली साडेचार वर्ष मालवणचे नगराध्यक्ष हे मालवण शहर सुधारणीसाठी झटत आहेत, या कालावधीत नगराध्यक्षांनी मालवण शहरात बरीच विकास कामे केली आहेत नगरपालिका ईमारत सुशोभिकरण, अग्निशामक बिल्डिंग, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,  भाजी मार्केट, कर्मचारी वसाहत तसेच  पर्यटनाचे आकर्षण ठरलेले म्युसिकल फाऊंटन असे अनेक प्रकल्प आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली  नगराध्यक्षांनी मालवण शहरासाठी आणले आहेत. 

त्याशिवाय वादळानंतरची मालवण शहरातील हानी, रस्त्यावर पडलेली झाडे झुडपे असो व मोडून पडलेले लाईटीचे पोल, हे सर्व काही सुरळीत सुरु व्हावे यासाठी नगराध्यक्षांनी वेळो वेळी संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व काही व्यवस्थित सुरु केले आहे. मालवण शहरात बहुतांशी ठिकाणी रस्त्याची कामे पूर्ण झाली. गटारांची कामे पूर्ण झाली आहेत. याची माहिती जर नगरसेवक गणेश कुशेंना नसेल तर त्यांनी शासन दरबारी घ्यावी व आपण कुठे अपयशी पडतोय त्याचे आत्मपरिक्षण करावे. जो वेळ गणेश कुशे दुसऱ्यांवर टीका करण्यात वाया घालवला आहे, तो वेळ जर शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी दिला असता तर जनतेचा फायदा झाला असता.

नगरसेवक यतीन खोत हे सुरुवातीपासून सेवाभावी वृतीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक सर्वत्र होतच आहे. ते आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत याच आम्हाला अभिमान आहे. गेल्या काही महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरासरीच्या नोंद विचारात घेता मालवण तालुक्यात सार्वधिक पाऊसाची नोंद आहे. असे असतानाही मालवण शहरात काही अपवाद वगळता शहरातील गटारे सफाईचा काम हे कौतुकास्पद आहे. ह्या सगळ्याचे श्रेय नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनाना मिळत आहे. यावर गणेश कुशे टीका टिपणी करतायत म्हणजे आपण कुठे तरी अपयशी पडत आहोत, असं ते दाखवत असल्याचा आरोप नगरसेविका शिरपुटे यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!