उद्योजक सागर वाडकर यांच्यावतीने कुणकवळे शाळेला प्रिंटर प्रदान

गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचीही मदत ; पालक, शिक्षक, ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण (प्रतिनिधी)
पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्या वतीने मालवण तालुक्यातील कुणकवळे प्राथमिक शाळेला प्रिंटर सुपूर्द करण्यात आला. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देखील करण्यात आली. यावेळी मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी हे देखील उपस्थित होते.

    कुणकवळे प्राथमिक शाळेला शैक्षणिक कामासाठी प्रिंटरची गरज होती.  याबाबत येथील ग्रामस्थ दादा नाईक यांनी श्री. सागर वाडकर याना सांगितले असता त्यानी शाळेला प्रिंटर व सर्व मुलाना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. पालकांच्या उपस्थितीत हे साहित्य वाटप करण्यात आले. तर शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडे प्रिंटर सुपूर्द करण्यात आला. शाळेची  शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धेतील यश पाहता या शाळेची इतरही शैक्षणिक गरजही आपण पूर्ण करू, असे आश्वासनही यावेळी सागर वाडकर यांनी दिले. यावेळी शाळा, पालकांकडून सागर वाडकर, मंदार केणी, दादा नाईक यांचे आभार  मानण्यात आले. या कार्यक्रमाला कुणकवळे गावचे सरपंच मंदार वराडकर, उपसरपंच सुरेश राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल पवार, मुख्याध्यापक सौ. सावली सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य सौ. देवयानी कदम, श्रावणी निकम, श्रेया दळवी, अंगणवाडी सेविका रूचाली नाईक, मदतनीस शुभांगी नाईक व ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!