तारकर्लीत उद्यापासून श्री संत बाळूमामा पादुका दर्शन आणि भंडारा उत्सव

२ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम ; भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील तारकर्ली गावात ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी आदमापूर निवासी श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचे आगमन होत आहे. यानिमित्ताने कृष्णा होम स्टे (श्रीमती रेश्मा ताई चव्हाण यांच्या निवासस्थानी) पादुका दर्शन आणि भंडारा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ रांजेश्वर तारकर्ली, जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान, वायरी बांध ग्रामविकास मंडळ, वायरी बांध तरुण उत्साही मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता भूतनाथ मंदिर वायरी मालवण येथे पालखीचे आगमन आणि स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता पालखीचे तारकर्ली दत्त मंदिरात आगमन होणार असून येथून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे. ११.३० वाजता पालखीचे उत्सव स्थळी आगमन होणार असून याठिकाणी ५१ सुवासिनींकडून पंचारतीने ओवाळणी करून स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता पादुका पूजन, सर्व देवतांचे पूजन आणि विद्यापूजन, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० वाजता दर्शन सोहळा आणि महाप्रसाद प्रारंभ, दुपारी २ ते ४ श्री संत नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचे भजन, दुपारी ४ ते ५ सिंधुदुर्ग धनगरी समाज मंडळ यांच्या वतीने धनगरी नृत्य, सायंकाळी ६ वाजता भैरव जोगेश्वरी मंडळ कुडाळ यांची फुगडी, सायंकाळी ७ वाजता श्री संत बाळूमामा महिला भजन मंडळ कर्ली, रात्री ८ वाजता श्री संत बाळूमामा चरित्र कथा, रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने होणार आहेत.

गुरुवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४ ते ६ काकड आरती श्री महापुरुष भजनी मंडळ देवबाग, सकाळी ७ वाजता श्री संत बाळू मामा ग्रंथ पारायण, ११ वाजता हरिपाठ भजन, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद आरंभ, दुपारी २ वाजता महापुरुष भजन मंडळ निवती यांचे भजन, दुपारी ४ वाजता धनगरी नृत्य – सिंधुदुर्ग धनगर समाज मंडळ, सायंकाळी ५ वाजता श्री संत बाळू मामा चरित्र कथा, सायंकाळी ६ वाजता श्री संत बाळूमामा सत्संग मंडळ सरंबळ यांचे सत्संग भजन, सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. नानासाहेब पाटील आदमापूर यांचे श्री बाळूमामा यांच्या जीवन चरित्रावर किर्तन, रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने असे कार्यक्रम होतील. शुक्रवारी २ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता ग्रंथ पारायण प्रारंभ व १० वाजता समाप्ती, सकाळी १०.३० वा. कात्याचे किर्तन, दुपारी १२.३० वा. दहीहंडी काला, दुपारी १.३० वा. महाप्रसाद सांगता सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!