आ. नितेश राणेंचे ठाकरे गटाला धक्के सुरूच ; सलग दहाव्या दिवशी भाजपा प्रवेशाचा सपाटा
करंजे मध्ये ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
कणकवली : भारतीय जनता पार्टी पक्षात आम. नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशांचा धडाका लावलेला असतानाच हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.
आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर आज या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आम. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. संदीप विठ्ठल मेस्त्री, सपना संदीप मेस्त्री, योगेश शामसुंदर दळवी, शितल योगेश दळवी यांनी भाजपात प्रवेश केला. आम. नितेश राणेंच्या उत्कृष्ट कामगिरीवर आणि विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही हा प्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. यावेळी करंजे गावचे सरपंच मंगेश तळगावकर, बूथ कमिटी अध्यक्ष तुकाराम परब, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश परब व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.