बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा मालवणात सत्कार

ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा सोबत युतीची चर्चा सुरु तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार : संजय आंग्रे यांची माहिती

मालवण भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर प्रथमच शनिवारी सायंकाळी उशिरा पक्षाच्या मालवण शाखेला भेट दिली. यावेळी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पक्षात प्रवेशासाठी गावागावात सर्वच ठिकाणावरून प्रतिसाद वाढत आहे. पक्षाकडून ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यासही अनेकजण इच्छुक आहेत. काही ठिकाणी भाजपासोबत युती करून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरु असून काही ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना स्व बळावर ही निवडणूक लढवेल. या अपेक्षीत यश प्राप्त केले जाईल. असा विश्वास संजय आंग्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर संजय आंग्रे यांनी पहिल्यांदाच मालवण कार्यालयात भेट दिली. यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, भास्कर राणे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, नीलम शिंदे, भारती धारगळकर, युटीन फर्नांडीस, राजा तोंडवळकर, अरुण तोडणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरूनही भक्कम पाठिंबा असल्याने या निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त होईल. गावाच्या, वाडीच्या विकासासाठी पक्ष कटीबद्द आहे. जनतेला अपेक्षित काम राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, नेते किरण सामंत व सर्व चांगले काम करत आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याने. पक्षाला पाठिंबा वाढत असल्याचे संजय आंग्रे यांनी सांगितले.

मालवण भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांनी यावेळी संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. समाजासाठी सातत्यपूर्ण काम करताना पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सौ. पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले

.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!