वैभव नाईक यांना मोठा धक्का ; कुडाळ तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार..

कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य परशुराम परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

गेले अनेक दिवस उद्धव ठाकरे सेनेत नाराज असलेले उद्धव ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य रानबांबुळी येथील परशुराम परब त्यांच्या कार्यकर्त्यां समवेत आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांसहित भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले. काल संध्याकाळी उशिरा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत परशुराम परब यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेला फार मोठे खिंडार पडले असून वैभव नाईक यांना हा मोठा धक्का बसला आहे..

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!