राज ठाकरे १ डिसेंबरला मालवण मुक्कामी ; २ डिसेंबरला आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती ; मालवणात पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांशी साधणार संवाद

मालवण | कुणाल मांजरेकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी ते मालवणात दाखल होत असून या दिवशी ते मालवण मुक्कामी वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मध्ये ते संघटनात्मक बैठका ते घेणार असून सायंकाळी चिवला बीच येथे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या मंदिराला ते भेट देणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवण मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मालवण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल विशाल मध्ये श्री. उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, रामनाथ पराडकर, भारती वाघ, प्राजक्ता पार्टे, संदीप लाड, प्रशांत पराडकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, उदय गावडे, साक्षी पार्टे, वैभव आजगांवकर, मिलिंद तेली, दर्शन सावजी, प्रतिक कुबल आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. उपरकर म्हणाले, राज ठाकरे १ डिसेंबर रोजी कुडाळ येथून मालवण ला दाखल होणार आहेत. चौके, कुंभारमाठ येथे त्यांचे भव्य स्वागत होणार असून हॉटेल जानकी मध्ये दुपारी १ वाजता ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघाटनात्मक कामाचा आढावा घेतील. त्यानंतर भरड नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ८ यावेळेत ते चिवला बीच येथे प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांशी चर्चा करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी २ डिसेंरला सकाळी १० वाजता आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. तेथून ते कणकवली कडे मार्गस्थ होणार आहेत, अशी माहिती परशुराम उपरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!