बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड

कणकवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. याबाबतची माहिती पक्षाचे नेते ब्रिगेडियर माजी खा. सुधीर सावंत यांनी दिली.

मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्न सिंधू योजना सदस्य किरण सामंत, माजी खा. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी माजी जि प सदस्य संदेश पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते. आग्रे यांच्याकडे कणकवली देवगड वैभववाडी कुडाळ मालवण या ५ तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!