मंदार ओरसकर यांची युवासेनेत बढती ; तालुका समन्व्यकपदी नियुक्ती

मालवण : युवा सेनेचे मालवण शहरप्रमुख मंदार यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या मालवण तालुका समन्वयक पदी नियुक्ती केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण शहरप्रमुख पदावर काम करताना मंदार यांची यांनी पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन त्यांची तालुका समन्व्यक पदी बढती करण्यात आली आहे. सातत्याने युवकांना प्रोत्साहन देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व युवकांना एकसंघ करून विविध उपक्रम राबविणारे ओरसकर हे आगामी काळातही युवकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना व्यासपीठ मिळवून देत युवकांच्या प्रगतीसाठी निश्चितच आश्वासक कार्य करतील, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे…

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!