मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात ?
दोन ते तीन दिवसात राजगड वरून अधिकृत दौरा जाहीर होणार
संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची कणकवलीत बैठक संपन्न ; आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा
कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा निश्चित झाला असून ३० नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते आगामी निवडणुका आणि पक्ष संघटना वाढीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड वरून अधिकृत दौरा जाहीर होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कणकवलीत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुका ताकदीनिशी लढावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, देवगड तालुकाध्यक्ष, चंदन मेस्त्री, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री, बाबल गावडे, कुणाल किनळेकर, अमोल जंगले, अमित इब्रामपूरकर, सचिन तावडे, संतोष मयेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.