… अन् अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले नितेश राणे !
सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय बुधवारी रात्री पाहायला मिळाला. आमदार नितेश राणे बुधवारी रात्री देवगडवरून येत असताना रस्ते अपघातात जखमीला मदत करून त्यांनी आदर्श घालून दिला.
आमदार नितेश राणे हे काल रात्री ११ वाजता देवगडवरून कणकवलीकडे येत असताना नांदगाव तिठ्या अलीकडे मोटर सायकल अपघातात जखमी झालेल्या आणि मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणाला आपल्या गाड्या थांबवून स्वतः खाली उतरून आमदार नितेश राणे यांनी मदत केली. त्यांनी अपघातग्रस्त तरुणाला आपल्या ताफ्यातील गाडीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांना मदत करा असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येते. आमदार नितेश राणे यांनी एका अपघातग्रस्ताला मदत करून एक आदर्श उदाहरण घालून दिले.