सागर वाडकर यांचे दातृत्व : गोपाळकाल्या निमित्त बाळ गोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम
मालवण : येथील प्रसिद्ध उद्योजक सागर वाडकर यांनी कोरोना काळातील आपलं दातृत्व कायम ठेवलं आहे. गोपाळकाल्या चे औचित्य साधून श्री. वाडकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून तारकर्ली मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले.
लहान मुलांना शिक्षणाची अधिक आवड निर्माण व्हावी या साठी मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या सामाजिक संस्थेने उद्योजक सागर वाडकर यांनी पुरस्कृत केलेले शैक्षणिक साहित्य वाटप केले. तारकर्ली मस्य शाळा (प्राथमिक ) येथे हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सागर वाडकर, संतोष लुडबे, संतोष नागवेकर, दादा वेंगुर्लेकर, तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर, अंगणवाडी सेविका माधुरी तारी, संध्या वायगणकर, लतिका मयेकर, सुप्रिया केरकर तसेच लहान मुले, त्यांचे पालक उपस्थित होते. तारकर्ली परिसरातील चार अंगणवाडी आणी त्यानंतर धुरीवाडा साईमंदिर अंगणवाडी, आणी रेवतळे फाटक शाळा अंगणवाडी येथे जाऊन हा कार्यक्रम करण्यात आला. अंगणवाडी सेविका आरोंदेकर मॅडम आणी गांगनाईक मॅडम यांनी उद्योजक वाडकर आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे आभार मानले.