सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची ३ नोव्हेंबरला कसाल येथे महत्वाची सभा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकाची महत्वाची सभा गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सिद्धीविनायक हाॅल, कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन संतोष गावडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठ पूणे यांच्या १७ फेब्रुवारी २०२२ च्या आदेशा विरुध्द सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिल करण्यात आले होते. त्या आदेशाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती तात्पुरत्या स्वरुपात आहे. याबाबत विचार विनिमय करून पुढील रणनिती ठरविण्यासाठी व पुढे कोर्टात बाजू मांडण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही सभा बोलविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अल्प मुदतीचे परवाने दाखल करताना येणार्या अन्य अडचणी बाबत तसेच वाहतूक पासबाबत आलेल्या नवीन नियमावली बाबत या सभेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. गावडे यांनी केले आहे.