स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त २ नोव्हेंबरला किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम
मालवण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, किल्ला प्रेमी, सेवाभावी संस्था यांनी या मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.