जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी संपन्न

मालवण येथे आयोजन ; ३२ मुलांची प्राथमिक फेरीसाठी निवड

मालवण : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन तर्फे अणि सिंधुदुर्ग जिल्हा किक्रेट असोसिएशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन बाळ चोडणकर उपस्थित होते. मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने नंदन देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी निवड समिती सदस्य पप्पू परब, नंदू रेडकर, उमेश मांजरेकर यांनी मुलांची मैदानावरील कामगीरी पाहून ३२ मुलांची प्राथमिक निवड केली. रविवारी घेण्यात आलेल्या या निवड चाचणीत १४ वर्षांखालील ५७ मुलांनी सहभाग घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!