तरुणांच्या उत्साहावर विरजण ; पोलीस भरती स्थगित

राज्य सरकारचा निर्णय ; नव्याने जाहिरात प्रकाशित होणार

मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयाकडून नोव्हेंबर महिन्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असताना नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची नवी जाहीरात लवकरच प्रकाशित होणार आहे.

राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करत होते. तर काही तरुणांनी पोलीस भरतीसाठी आंदोलन केल्याचं देखील समोर आलं होतं. या दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची परीक्षा लवकरच जाहीर होईल, असं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या पोलीस भरतीसाठी 3 नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पण त्यांचा पुन्हा हिरमोड झाला. आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव भरती स्थगित करण्यात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच भरतीबाबत नवी जाहीरात लवकर जाहीर करण्यात येईल, असं देखील प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!