“त्या” खेळाडूंना विशाल सेवा फाउंडेशन आणि भाजपाचा सहकार्याचा हात !
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही मदत ; खेळाडूंनी मानले आभार
कुडाळ : येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या खेळाडूंचे शनिवारी अभिनंदन करण्यात आले. तसंच या खेळाडूंच्या प्रवासासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, विशाल सेवा फाउंडेशन तर्फे तसेच कुडाळ भाजपा यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. त्यांच्या सर्व प्रवासाची जबाबदारी कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आली. कुडाळ सेल्फी पॉईंट येथे त्या सर्व खेळाडूंना मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी खो खो खेळाडू तसेच भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, उपाध्यक्ष चंदन कांबळी, सोशल मीडिया युवा संयोजक राजवीर पाटील, नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, कु. चांदणी कांबळी, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, श्रावण शिरसाट, अनुप जाधव, राम बांदेलकर, विलास वराडकर, प्रसन्न गंगावणे आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.