कुणकेश्वरच्या विकासासाठी आ. नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही घेतली भेट ; अहवाल सादर करण्याचे ना. एकनाथ शिंदेंचे आदेश
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वर देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
येथील मंदिर परिसर सुशोभिकरण करणे गरजेचे आहे, तसेच पर्यटन दृष्ट्या गावच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात धार्मिक स्थळांचा विकास होत आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील धार्मिक स्थळांचा विकास करण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. त्याच अंतर्गत कुणकेश्वरचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे, असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे.