बा देवा रामेश्वर नारायणाSSS… निलेश राणे कुडाळ – मालवण मधून आमदार होऊंदेत !
भाजपचे युवा नेते विशाल परब यांचं मालवणात रामेश्वर – नारायणाच्या पालखी सोहळ्यात साकडं
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांचा पालखी सोहळा बुधवारी रात्री संपन्न झाला. यानिमित्ताने मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती. भाजपचे युवा नेते विशाल परब यानी श्री देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेत आपले प्रेरणास्थान भाजपचे नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मधून आमदार म्हणून निवडून येऊ देत. अशा पद्धतीचे साकडे रामेश्वराला घातले आहे.
पालखी सोहळ्याने मालवण बाजारपेठ गजबजून गेली होती. दिवाळी पाडवा व भाऊबीज या द्विगुणित आनंदात अतिशय भक्तीमय वातावरणात हा पालखी सोहळा संपन्न झाला. भाविकासह सर्वच पक्षाच्या प्रमुख राजकीय नेते व पदाधिरांनी दर्शन घेत रामेश्वराला साकडे घातले. मालवण शहरातील दरवर्षी साजरा होणारा श्री देव रामेश्वराचा पालखी सोहळ्यास यावर्षी सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात भाविक मालवणात दाखल झाले होते. भाजपचे युवा नेते विशाल परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेत भाजपचे नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येवूदेत असे साकडे घातले. तर मालवणवासियांच्या उत्तम आरोग्य, शेतकरी, व्यापारी व मच्छीमारांच्या व्यवसायात वृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण चरणी मालवण वासियांच्या उत्तम आरोग्याची, किनारपट्टी भागातील मच्छीमार व व्यापारी वर्गाच्या व्यवसायात यश मिळण्याकरिता व शेतकऱ्याना शेतीमधून भरभराट होणेकरिता विशाल परब यांनी साकडे घेतले. यावेळेस विशाल परब यांच्यासोबत दादा साईल, आनंद परब यांनी सुद्धा दर्शन घेतले. यावेळेस हजारोंच्या संख्येने मालवणवासीय उपस्थित होते.