पाकिस्तान वरील अविस्मरणीय विजयाचे मालवणात शिवसेनेकडून “सेलिब्रेशन”

मालवण : टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात झालेल्या रोमांचक लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयानंतर देशभरात दिवाळीचा उत्साह अधिकच वाढला असून मालवण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येथील शाखे समोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, प्रसाद आडवणकर, दीपक देसाई, बंड्या सरमळकर, दादा पाटकर, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!