मालवण आगारातून लातूर बसफेरी सुरू

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती

मालवण : प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार मालवण एसटी आगारातून मालवण लातूर ही नवी बसफेरी गुरुवारी २० ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे.

मालवण आगारातून दुपारी २.१५ वाजता ही बस सुटणार आहे. मालवण कसाल फोंडा राधानगरी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर मार्गे लातूर पहाटे ४:१५ वा. पोहचणार अशी ही बसफेरी दर दिवशी असणार आहे. तर सायंकाळी ७:३० वाजता लातूर वरून लातूर मालवण ही बसफेरी असणार आहे. ती सकाळी १०:३० वाजता मालवणात पोहचणार आहे. अशी माहिती मालवण आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!