उमेश मांजरेकर यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदी नियुक्ती !

वाढदिवसा दिवशी अनोखी भेट ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेश मांजरेकर यांचा गुरुवारी वाढदिवस असून या औचित्यावर त्यांना पक्षाकडून ही अनोखी भेट देण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपातालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेश परब, नरेश हुले, बंड्या सरमळकर, सचिन गिरकर, प्रसाद आडवलकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!