युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा !
मालवण येथील निलरत्न निवासस्थानी माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश
चांगले काम करा, युवकांची मजबूत फळी उभारून समाजाला दिशा द्या : राणेंचा सल्ला
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न निवासस्थानी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. युवकांची मजबूत फळी उभारून पक्ष संघटना सक्षम करताना समाजाला दिशा देणारे काम करा, अशा सूचना श्री. राणे यांनी यावेळी दिल्या.
सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर हे मालवण शहराच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, मोहन वराडकर, आबा हडकर, अरविंद सावंत, शेखर राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह सौरभ ताम्हणकर, निशय पाळेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, गौरव लुडबे, जयेंद्र करंगुटकर, अंकित धुरी, चिन्मय ढोलम, कुणाल खानोलकर, रुपेश कांबळे, दादा कोचरेकर, निनाद बादेकर, पंकज गावडे, पराग परब, राज कांदळकर, हर्षद तळवडेकर आदी उपस्थित होते.