कुडाळमध्ये आज रंगणार युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांची मैफिल
केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे, आ. शहाजी बापू पाटील, उद्योजक किरण सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, युवा कीर्तनकर चैतन्य महाराज वाडेकर, सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांच्या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल प्रभाकर परब यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा आणि विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने कुडाळ मध्ये त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. कुडाळ मधील वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये सायंकाळी ५.३० वा. पासून विविध कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमांस केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, शिंदे गटाचे लोकप्रिय आ. शहाजी बापू पाटील, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा आणि शिंदे गटातील मैत्रीचा नवा अध्याय सुरु होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल परब मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने जिल्ह्यात “विशाल सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने १२ ऑक्टोबर पासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. वाढदिवस अभिष्टचिंतनाचा मुख्य सोहळा आज शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी कुडाळ मधील वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये होणार आहे.
सायंकाळी ५.३० वा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आ. शहाजी बापू पाटील, आ. नितेश राणे, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नव्या राजकीय मैत्रीची सुरुवात या निमित्ताने होत आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, युवा कीर्तनकर चैतन्य महाराज वाडेकर, सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांच्या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली असून या शिवाय अन्य विविध कार्यक्रम देखील होणार आहेत. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.