धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील डाक विमा शिबिराला नागरिकांची अलोट गर्दी
मच्छीमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या वतीने आयोजन
पहिल्या दिवशीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सलग दुसऱ्या दिवशी आयोजन
मालवण : कुणाल मांजरेकर
भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज आलियांजचा वार्षिक ३९६ रुपयांमध्ये अपघाती वीमा राबवला जात आहे. मच्छिमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या वतीने येथील मच्छीमार बांधव आणि नागरिकांसाठी धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरात गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस हे शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. मात्र नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शुक्रवारी देखील शिबीर भरवण्यात आले. यावेळी आयोजक बाबी जोगी यांच्यासह धुरीवाडा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्तात्रय केळुसकर, माजी अध्यक्ष किशोर वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग सहकारी संस्था सचिव योगेश मंडलिक, मत्स्य व पर्यटक व्यापारी तुळशीदास गोवेकर, रापण संघाचे दाजी जोगी, विनायक मंचकर, सनी डेकोरेटर मंडपचे मालक संजय कासवकर, दीपक धुरी, सुशील तारी, ज्ञानेश्वर वेंगुर्लेकर, जया खुर्ची, लोकेश परब, हेमंत जोशी, प्रवीण वेंगुर्लेकर, गणेश मसुरकर, आनंद टिकम व इतर मच्छीमार ग्रामस्थ उपस्थित होते.