निलेश राणेंच्या शिकवणीतूनच सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न !

वेंगुर्ल्यातील “विशाल श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी युवा नेते विशाल परब यांचे उद्गार

विशाल परब हे “स्पार्कींग मॅन” भविष्यात नक्कीच आमदार अथवा खासदारकीची संधी : आ. जीत आरोलकर यांचा विश्वास

वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव लवकरच भरविणार : विशाल परब यांची माहिती

वेंगुर्ले : वाढदिवसाचं औचित्य साधून ६५ कातकरी मुलांना मी दत्तक घेतलय. हा माझ्या जीवनातील एक सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. आपण शंभर रूपये कमवले तर त्यातील दहा रूपये सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करावेत, ही शिकवण माझे गुरु निलेश राणेंनी मला दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माझी सामाजिक जीवनातील वाटचाल सुरु आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते, तथा उद्योजक विशाल परब यांनी वेंगुर्ले मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशाल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली. भविष्यात वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव आयोजित करण्याचा माझा मानस असून तो भव्यदिव्य असेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुले येथील कै. मधुसुदन कालेलकर सभागृहात आयोजित “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक विशाल परब, भाई सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, अक्रम खान, प्रितेश राऊळ, भाई राणे, राजन गिरप, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, अनंत परब, किशोर सनसुरकर, प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, बाळू देसाई, अँड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

१५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर

आजच मी मुंबईत निलेश राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी १५ ऑक्टोबरला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्याची त्यांना विनंती केली असून ह्या दोन्ही नेत्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आश्वासित केलं आहे. महाराष्ट्रातील हे दोन द्विगज नेते एकाच व्यासपीठावर येणार असून त्यांना एकत्र आणण्याच योग मला आणता आला, याचा फार आनंद होतोय, असं विशाल परब यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना आ. आरोलकर म्हणाले, विशालची आणि माझी २००८ मध्ये ओळख झाली. अतिशय मनमिळाऊ व स्मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. विशालच्या सर्व इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे ते म्हणाले. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब म्हणाले, तुमच्या शिवाय कार्यक्रम होण शक्य नाही. मी फक्त नाममात्र आहे. संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, माझे सहकारी मित्र, प्रेमी यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले असून हे प्रेम मी आयुष्यात विसरू शकत नाही. यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी आठ दिवसाचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला असून गोरगरीब जनतेसाठी देखील उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

विशाल परब आमदार अथवा खासदार होणार, ही काळ्या दगडावरची रेघ

विशाल परब याच्यामध्ये तेज आहे. म्हणून मी त्याला आजच नाव देतो की “स्पार्कींग मॅन”. भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. विशाल मी तुला शब्द देतो की वेंगुर्ला तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे. येथील मुल जी कामाला येतात त्यांना कुठलीच अडचण मी येवू देणार नाही. विशाल परब यांच्या सारखा मला दिलदार मित्र लाभला याचे मी भाग्य समजतो. विशाल परब यांनी जे जीवनात कमी कालावधीत कमवल आणि यश मिळवल ते सोपं नाही. त्यासाठी जिद्द आणी मेहनत आहे, असे मांद्रे विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!