उद्धव साहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है…!

शिवसेनेच्या कणकवलीतील दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत शिवसैनिकांचा जल्लोष

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; कोल्हापूर मधील प्रसिद्ध सार्झन डीजेवर तरुणाई थिरकली

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… शिवसेना जिंदाबाद… घोषणाबाजीसह डीजेच्या तालावर थिरकत कणकवलीत शिवसैनिकांनी गुरुवारी जल्लोष केला. निमित्त होते शिवसेना कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिष्ठापणा केलेल्या दुर्गामातेची भव्य विसर्जन मिरवणूकीचे !

आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्रोत्सव स्थळापासून महामार्गावरून पटवर्धन चौक ते कणकवली बाजारपेठेतुन गणपती साना पर्यंत देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूर येथील प्रसिद्ध सार्झन डीजे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. या डीजेच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला होता. यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!