बिरमोळे ऑटोमोबाईल्सचा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ !

मालवण कुंभारमाठ येथे लहान – मोठ्या वाहनांच्या स्पेअरपार्ट्स आणि ऑइल विक्रीचे दालन

मालवण | कुणाल मांजरेकर

विजयादशमीच्या मुहूर्तावर मालवण कुंभारमाठ येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या बिरमोळे ऑटोमोबाईल्सचा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ बुधवारी शुभारंभ करण्यात आला. घुमडे येथील उमेश बिरमोळे यांनी या माध्यमातून ऑटोमोबाईल्स व्यवसायात पदार्पण केले आहे. याठिकाणी लहान मोठ्या सर्व प्रकारच्या वाहनांचे स्पेअरपार्ट्स आणि ऑइल माफक दरात उपलब्ध होणार आहे.

श्री. बिरमोळे यांनी कुंभारमाठ पॉवर नजीक बस स्टॉप जवळ हे दालन सुरु केले आहे. याठिकाणी ट्रक, डंपर, जेसीबी सह बोलेरो पीक अप आणि सर्व प्रकारच्या लहान मोठ्या वाहनांचे स्पेअर पार्ट्स आणि ऑइल उपलब्ध होणार आहे. या उदघाटन प्रसंगी दत्ता सामंत यांच्यासह नामदेव बिरमोळे, सौ. सुलभा बिरमोळे, उमेश बिरमोळे, सौ. सुप्रिया उमेश बिरमोळे, बाळा माने, बाबू बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, सुधीर वस्त, मधुकर चव्हाण, बाळा सामंत, भाऊ सामंत, दत्तू बिरमोळे, बबन बावकर, सुभाष लाड, चौगुले सर, श्री. नातेवाड, धोंडी नाईक, प्रशांत नाईक, उल्हास चव्हाण, उत्कर्षा चव्हाण, रंजना गावडे, गणपत बिरमोळे, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, राजा बिरमोळे, गोट्या राणे, प्रदीप बिरमोळे, महेंद्र धुरी, सानिका गोवेकर, रवी बिरमोळे, संतोष चव्हाण, अमित बिरमोळे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!