उद्धव ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना
आ. वैभव नाईकांचे नेतृत्व : कुडाळ, ओरोस, व कणकवली रेल्वेस्टेशनवर शिवसैनिकांची घोषणाबाजी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आज सायंकाळी मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाले. दसरा मेळाव्याच्या उत्साहाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे. यावेळी कुडाळ, ओरोस, कणकवली रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक यांचा विजय असो अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान, एकनिष्ठ शिवसैनिकांचा पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळावा उद्या ५ ऑक्टोबर रोजी सायं. ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर येथे संपन्न होणार आहे. न भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर झालो आहोत असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, मंदार केणी, किरण शिंदे, पंकज सादये, उदय मांजरेकर, बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, अवधूत मालंडकर, राजू गवंडे, अनुराग सावंत, संदीप म्हाडेश्वर, भाऊ चव्हाण, अमित भोगले, मंदार ओरसकर, संजय भोगटे, समीर लब्दे, बाळू पालव, सचिन कदम, संतोष पाटील, सागर भोगटे, बाबा सावंत, अमित राणे, विनायक परब, गुरु गडकर, गंगाराम सडवेलकर, बाबू टेंबूलकर, अरुण परब, नंदकिशोर परब, जगदीश राणे, भूषण कुडाळकर, संदेश सावंत, प्रमोद ठाकूर, सागर माळगी, राजू घाडी, विरेश परब आदींसह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.
याप्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रामू विखाळे, अँड. हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, सचिन आचरेकर, रिमेश चव्हाण, बंडू ठाकूर, महेश कोदे, विलास गुडेकर, प्रदीप मसुरकर, समीर परब, योगेश मुंज, विनायक हडकर, अजित काणेकर, अवी सावंत, स्वप्नील पाटील, रुपेश आमडोस्कर, दीपक गुरव, गुरु पेडणेकर, सचिन राणे, विलास गुडेकर, महानंद चव्हाण, ओमकार चव्हाण, मिलिंद आईर, उत्तम वाळके, ईरा गावडे आदी उपस्थित होते.