भजनी बुवांनी भजन सेवा पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत

प्रसिद्ध भजनी बुवा गुंडू सावंत यांचे प्रतिपादन : मालवण मध्ये भजन महोत्सवाचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

मी अनेक ठिकाणी भजने, डबलबारी केल्या. त्याठिकाणी मायबाप रसिकांनी भरभरून कौतुक केले आणि पारितोषिकांचा पाऊस पाडला. मात्र श्री भैरवीदेवी बाळगोपाळ मित्रमंडळाने भजन महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचे निश्चीत केल्याने माझ्याकडून परमेश्वराची भजनरूपी होत असलेल्या आराधनेचा, कलेचा आज याठिकाणी सन्मान झाला आहे. जिल्ह्यातील यशस्वी आणि नवोदित भजनीबुवांनी भजनरूपी सेवा सदोदीत पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशिल रहावे, असे प्रतिपादन डबलबारी भजनाचे प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत यांनी केले.

येथील बाजारपेठ संतसेना मार्गावरील श्री देवी भैरवी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजन महोत्सवाचे उद्घाटन श्री. सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा मंडळाच्यावतीने अध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपिठावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, नाभिक समाजाचे नेते विजय सिताराम चव्हाण, तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर प्रतिमा चव्हाण, विशाखा चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना कांता चव्हाण यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती देताना यावर्षी डबलबारीतील प्रसिद्ध भजनीबुवांना महोत्सवात निमंत्रीत करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी गोवा येथील घुमट भजन, महिलांच्या फुगडी हेही कार्यक्रम होणार असल्याबद्दल माहिती दिली. सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जात असताना सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मंदिरात नियमीतपणे आकर्षक रांगोळी सजावटही मंदिर परिसरात महिलांकडून करण्यात येत असल्याचेही सांगितले.

भैरवी बालगोपाळ आदर्शवत मंडळ : अनिल मालवणकर

भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळ हे आदर्शवत मंडळ आहे. याठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांना एकत्रित ठेवण्याची ताकद श्री देवी भैरवी ही या मंडळाच्या कार्यकर्त्यांना देत आहे. अशाप्रकारच्या उपक्रमातून आपल्या समाजात एकी आणि समाजात अध्यात्मीक जागृती करण्याचे होत असल्याने ते कौतुकास्पद आहे. मी या मंडळाच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे आणि याहीपुढे मंडळाच्या पाठिशी खंबीरपणे उभा असणार आहे अशा शब्दात उद्योजक अनिल मालवणकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विजय शिवा चव्हाण, उदय चव्हाण, राहुल चव्हाण, रोहन चव्हाण, दिपक चव्हाण, उत्तम चव्हाण, हेमंत चव्हाण, ललीत चव्हाण, किशोर चव्हाण, राजू चव्हाण, दिलीप वायंगणकर, सुनील वायंगणकर, रामकृष्ण चव्हाण, राजन सकपाळ, बबन सकपाळ, उद्देश चव्हाण, बापुजी चव्हाण, जगदीश वालावलकर, लबू चव्हाण, कौशल्य वस्त, संजय चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

राजकीय कारकीर्दीची सुरुवात आणि प्रगती याच भागातून : सुदेश आचरेकर

भजनातून समाजप्रबोधन आज युवा पिढीला भजनातील आनंद आणि त्यातील समाधान मिळवून देण्यासाठी भैरवी मंदिर परिसरातील युवा वर्ग गेली दहा वर्षे हा भजन महोत्सव आयोजित करत आहे. याठिकाणी जिल्ह्यातील अनेक नामवंत भजनीबुवा आपली सेवा बजावत आहे. या मंदिरात असलेली एक विलक्षण शक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा मंदिरात येवून याठिकाणी होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आकर्षित करत असते. मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि प्रगती याठिकाणाहूनच केलेली आहे. हे मंदिर आणि याठिकाणचा मित्रपरिवार माझा हक्काच आणि जिव्हाळ्याचा आहे, अशा शब्दात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शुभेच्छा दिल्या. नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सर्वांनी अशाचपद्धतीने एकत्रित राहून समाज प्रबोधनाचे काम करावे असे सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!