होय…. मी शिंदे गटात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचे स्पष्टीकरण ; खा. विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांना मोठा धक्का

मालवणचे राजा गावकर देखील शिंदे गटात दाखल ; बबन शिंदे यांनी दिली माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

शिंदे गटाने सिंधुदुर्गात शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. खासदार विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे खास मर्जीतील सहकारी म्हणून ओळख असलेल्या उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. श्री. शिंदे यांनी स्वतः या प्रवेशाची माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मालवण येथील राजा गावकर यांनीही यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. खासदार विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे खंदे समर्थक असलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याची माहिती स्वतः बबन शिंदे यांनी दिली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना शिंदे गटाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे स्वागत केले. यामध्ये उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्यासह राजा गावकर, यांनीही प्रवेश केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!